आषाढी पायी वारी सोहळा आळंदीत, पहिल्या एकादशी दिनी गर्दी
हरीनाम जय घोषाने मंदिर परिसर दुमदुमला
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची आळंदीत विविध कार्यक्रमांनी नाम गजरात सांगता झाली. तीर्थक्षेत्र आळंदीत भाविकांनी मंदिरासह पालखी ग्रामप्रदक्षिणेत माउली पालखीचे तसेच मंदिरात श्रींचे संजीवन समाधी दर्शनास गर्दी केली. आषाढी पायी वारी पालखी सोहळा आळंदीत परतीचे प्रवासात आल्यानंतर आलेल्या पहिल्याच एकादशीदिनी आळंदीत भाविकांनी मंदिर आणि दिंड्यांचे हजेरी दरम्यान गर्दी केली. माउली मंदिर येथी परंपरांचे पालन करीत पालखी मार्गावरून पालखी हरिनाम गजरात हजेरी मारुती मंदिरात आली. येथे आळंदी संस्थानचे सेवक बाळासाहेब रणदिवे चोपदार यांचे मार्गदर्शनाखाली दिंड्यादिंड्यातील अभंग,भजन हजेरीत झाले.हरिनाम जय घोषाने मंदिर परिसर दुमदुमला.
रांग सोपान पुलापर्यंत
दरम्यान आळंदीतील परंपरेने एकादशी श्रीची पूजा, आरती, फराळाचा नैवेद्य वाढविण्यात आला. बारीत रांगा लावत भाविकांनी दर्शनास गर्दी केली. पालखीचे प्रदक्षिणेच्या ग्रामस्थ, भाविकांनी रस्त्याचे दुतर्फा तसेच हजेरी मारुती मंदिरात भाविकांनी हजेरीसह दर्शनास गर्दी केली होती. यावेळी उपस्थित वारकरी, भाविकांनी टाळमृदंगाचा गजर करीत अभंग सेवा रुजू केली. दिंड्यांची ग्रामप्रदक्षिणा गजरात करीत एकादशीची सेवा रुजू केली. मंदिरातील दर्शन बारी पूर्ण भरल्याने भाविकांची दर्शनाची रांगाभक्ती सोपान पुलावर गेली होती. मंदिरातील सर्व दरवाजे सुरक्षेचे कारणास्तव खुले ठेवण्यात आले होते.
दिंडी प्रमुख, मानकर्यांचा सत्कार
ग्रामप्रदक्षिणेत हजेरी मारुती मंदिर येथे पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुख वारकरी, भाविक, देवस्थानचे मानकरी, सेवक, हांडेवाले, तुळशीवाले वारकरी महिला, पालखीचे चार खांदेकरी,मानकरी तसेच विविध दिंडी प्रमुखांचा देवस्थानांचा नारळ प्रसाद देऊन सत्कार हजेरीत भजना नंतर नारळ प्रसाद देऊन करण्यात आला. आळंदीकर ग्रामस्थ यांचे वतीने पालक संघाचे अध्यक्ष श्रीधर कुर्हाडे ,माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील तसेच सेवक पुण्यातील डॉ.नाईक यांचे तर्फे आरिफ शेख यांनी यावेळी मानकर्यांना नारळ प्रसाद देत सोहळ्याची हरिनाम गजरात सांगता झाली.
मंदिर परिसरात पुष्पसजावट
आळंदी मंदिरात माऊलींची पालखी आल्यानंतर देवस्थान तर्फे दिंडी प्रमुख, मानकरी, श्रीचे चोपदार, मानकरी यांचा मानकरी योगेश आरु, बाळासाहेब कुर्हाडे, मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, सेवक बाळासाहेब रणदिवे चोपदार आदींना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. पालखी सोहळ्याचे स्वागत आणि एकादशीचे औचित्य साधून माउली मंदिर परिसरात आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होती. आळंदीत भाविकांना फराळ आणि फळे वाटप झाले. पालखी मंदिरात आल्यानंतर श्रींची आरती आणि नारळ प्रसाद वाटते आषाढी वारी पालखी सोहळ्याची सांगता हरिनाम गजरात झाली.