नवी दिल्ली : बॉलीवूडचा व्हर्सटाईल अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी ‘ठाकरे’ चित्रपटामध्ये बाळासाहेबांची भूमिका साकारत आहे. ज्या भूमिकेमध्ये आव्हान नाही अशी भूमिका स्वीकारतच नसल्याचे नवाजने म्हटले आहे.
”मला आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात. प्रत्येक चित्रपटात मी काहीतरी नवे करण्याचा प्रयत्न करत असतो. मला सोप्या भूमिका करण्याचा तिरस्कार आहे. मला एक चतुरस्त्र अभिनेता बनायचे आहे. आता मी माझ्यासाठी फक्त नवीन, वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका शोधत आहे.” असं नवाज म्हणाला.