ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण कालवश

0

मुंबई प्रतिनिधी । ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन झाल्यामुळे चित्रपट व नाट्य सृष्टीवर शोककळा पसरली आहे. उपचारादरम्यान त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला.

विजय चव्हाट यांना फुफ्फुसाचा आजार होता. मुंबईतल्या मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील तारा निखळल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. विजय चव्हाण यांनी आतापर्यंत सुमारे ३५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय त्यांची अनेक नाटकेदेखील तुफान लोकप्रिय झाली होती. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिकांना रसिकांनी डोक्यावर घेतले होते. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. मोरूची मावशी या नाटकात त्यांनी रंगवलेले स्त्री पात्र अजारामर झाले आहे.