ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे निधन

0

नवी दिल्ली-पाकिजा आणि रजिया सुलतान या सिनेमांमधून उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे आज सकाळी ९ वाजता मुंबईतील वृद्धाश्रमात वृद्धापकाळाने निधन झाले. कमाल अमरोही यांच्या पाकीजा सिनेमात गीता यांनी राजकुमार यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती. निर्माते अशोक पंडित यांनी गीता यांच्या निधनाची बातमी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली. अशोक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला.