ज्येष्ठ नागरिक संघाचा आठवा वर्धापनदिन साजरा

0

संघाच्या वार्षिक अहवालाचे केले प्रकाशन

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील हॉटेल गोविंद गार्डन येथील पिंपळे सौदागर ज्येष्ठ नागरिक संघाचा आठवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापौर नितीन काळजे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, पवना सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे झोपे काका, नगरकर काका, न्यू सिटी प्राईड स्कूलचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, इंदू सूर्यवंशी, कमल देशमाने, मनीषा शिर्के, शैला गुजलवार आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक संघाच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.