शहादा। येथील वसंतराव नाईक शैक्षणिक संकुलातील समर्थ सभागृहात ज्येष्ठ नागरिक संघाचा तालुकास्तरीय जागृती मेळाव्याचे आयोजन दि. 15 जुन रोजी दुपारी 3 झाले .मेळाव्याचा अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक संघाचे खान्देश प्रादेशिक विभागाध्यक्ष प्राचार्य व्ही.के.भदाणे होते.या प्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष मोतीलाल पाटील,समनवयक व नगरसेवक मकरंद पाटील, वृक्षमित्र हैदर नुराणी, रंजना कान्हेरे ,डॉ. शरदचंद्र वडाळक ,ड महम्मद पठाण,शंभु पाटील,कोमलसिंग गिरासे, प्रा. डॉ.ए.एन.पाटील,सेवानिवृत्त प्रा. जे. डी. पाटील,ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष डी. एच. पाटील, सेवानिवृत्त उप वनसरक्षक शिवदास पाटील, पाडळदा नूतनीकरण विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष रमेश चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरीकांसाठी विविध योजना
ज्येष्ठ नागरिकांच्या अत्याचाराबाब्त जागृती व्हावी त्यांच्या मालमत्तेचे सरक्षंण व्हावे. कौटुंबिक अत्याचार थांबवावेत या संदर्भात जागृती व्हावी म्हणून मेळाव्याचे आयोजन होते. मेळाव्यात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे एका वृध्द (96 वर्षे )महिलेने हजेरी लावल्याने कौतुक करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्य भदाणे यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठी विविध योजना आहेत,पण त्या प्रत्यक्षात कृतीत उतरत नाही. शासकीय अधिकारी ज्येष्ठ नागरीकांना सहकार्य करण्यापेक्षा अडथळे आणतात हे दुर्दैव आहे. ज्येष्ठ नागरिकावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत पण शासन उपाययोजना करत नाही. कायदा अंमलात आणला गेला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व्हायला पाहिजे असे आवाहन केले . या व्यतिरिक्त रंजना कान्हेरे, बारकु पाटील यांनी मनोगत व्यक्त केले . काहीनी कविता म्हणून दाखवल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राचार्य जे. डी. पाटील यांनी केले. कार्यक्रमात सर्वात मोठे योगदान व परीश्रम ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था नंदुरबार यांनी घेतले.