चाळीसगाव । चाचाळीसगाव तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या चाळीसगाव अध्यक्षपदी येथील शिवकॉलनी स्थित रहिवाशी व शासकीय दुध डेअरीतील सेवानिवृत्त व्यवस्थापक प्रकाश नामदेव पाटील यांची 13 डिसेंबर रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर यावेळी इतर कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या चाळीसगावाची सर्वसाधारण सभा 13 डिसेंबर रोजी येथील विमानतळस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात उत्साहात पार पडले.
निवडप्रसंगी यांची होती उपस्थिती
सुत्रसंचालन शरद बारपांडे यांनी केले तर सभेस रमेश जाधव, रमेश पोतदार, परेल साहेब, चंद्रकांत साळे, श्रीधर नवले, डी.बी.पवार, किसान आसोदे, बक्षीसाहेब, कौतीक पाटील, बी.आर.पाटील, धर्मा पाटील, साहेबराव पाटील, पोपट असबे आदींची उपस्थिती होती. निवडीबद्दल प्रकाश पाटील, व्ही.आर.राजपूत, बळीराम झोपे, दत्तात्रय बच्छाव यांचे ज्येष्ठ नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.
कार्यकारिणी जाहिर
यावेळी झालेल्या सभेत प्रकाश नामदेव पाटील यांची ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी व्ही.आर.राजपूत, सचिव बळीराम विठ्ठल झोपे तर उपसचिव दत्तात्रय बच्छाव यांची निवड करण्यात आले.