ज्येष्ठ महिलेची फसवणूक                                            

0
खडकी : खासगी कंपनीतील शेअर्स गुंतवणुकीद्वारे दामदुप्पट रक्कम करुन देण्याच्या बहाण्याने अनोळखी इसमांनी एका 66 वर्षीय ज्येष्ठ महिलेला सुमारे 1 लाख 44 हजार 598 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेने आर्थिक फसवणूक प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश इंदौर येथिल बोनाज कॅपीटल इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजर कंपनीतील सत्यविर व मनोज वर्मा यांनी फिर्यादी महिलेस त्यांच्या कंपनीत शेअर्स गुंतवणूक केल्यास दामदुप्पट रक्कम मिळेल असे आमिश दाखविले. त्यानुसार ज्येष्ठ महिलेशी फोनवरुन सतत संपर्क साधुन महिलेचे वेगवेगळे बँकेचे एटीएम कार्डची गोपनीय माहिती काढून घेतली. त्यांच्या बँक खात्यातील आँनलाईन ट्रान्झेक्शनद्वारे वेळोवेळी 1 लाख 44 हजार 598 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना जानेवारी ते मे 2018 या दरम्यान घडली. ही कंपनी व फोन करणार्‍या व्यक्तिंशी महिलेने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे येथे धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञात इसमांच्या नावे गुन्हा दाखल केला असुन आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस उप निरिक्षक (गुन्हे) एस.एस.पठाण करीत आहेत.