ग्रीन रिफायनरी आणि अणूऊर्जा प्रकल्प एकत्र हा धोकाच
नागपूर – ग्रीन रिफायनरी आणि न्युक्लिअर पॉवर प्रोजेक्ट एकत्र आल्यास मोठा धोका होवू शकतो असे विधान ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी केले होते. याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेल्या नाणार प्रकल्पाच्या स्थगन प्रस्तावावर बोलताना केली.
हे देखील वाचा
जगात कुठेही न्युक्लिअर पॉवर आणि ग्रीन रिफायनरी प्रकल्प एकत्र नाही. मात्र एकीकडे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला मान्यता दिली आहे. दुसऱ्या बाजूला ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. या दोन्ही प्रकल्पात हवाई अंतर १.२ किलोमीटरचा आहे. त्यामुळे हा प्रकल्प धोकादायक आहे असेही आमदार भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.
नाणार येथील हा १७ गावांचा हा प्रश्न नाही हा संपूर्ण कोकणाचा प्रश्न आहे. कोकणाच्या आजूबाजूला सांगली आणि कोल्हापूर जिल्हाही आहे. या जिल्ह्यांनाही धोका पोचू शकतो आहे. त्यामुळे सरकारने हट्ट सोडावा. आम्ही कोकणातील लोक जिवंत राहिलो तरच आम्हाला रोजगार मिळणार आहे. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर तात्काळ चर्चा करा अशी स्पष्ट भूमिकाही मांडली.
