जयपुर राजस्थान: विविध क्षेत्रात समर्पित भावनेने जनसेवेचे कार्य निरंतर, निरपेक्षपणे व सेवाव्रती सात्विक कार्याबद्दल देण्यात येणारा गुरु रत्न पुरस्कार 2023 डॉ. रवींद्र भोळे यांना प्रदान करण्यात आला. भारताचे पूर्व राष्ट्रपती व भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्ताने वरील पुरस्कार देण्यात येतो. भावना कला साहित्य अकॅडमी जयपूर संस्था सलग्नित मिनिस्ट्री ऑफ एम एस एम इ, निती आयोग भारत सरकार यांच्या वतीने गुरु रत्न पुरस्कार 2023 पुरस्कार प्रदान करण्यात आला . तसेच एस एस आय एफ संस्था मंत्रालय, निती आयोग दिल्ली भारत सरकार सलग्नित संस्थेच्या वतीनेही डॉ.रवींद्र भोळे यांना गुरु रत्न पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. ह्या संस्थेने भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू दिल्ली यांनाही सन्मानित केलेले आहे. एस एस आय एफ संस्थेच्या अध्यक्ष एस स्मृती सारस्वत यांनी वरील पुरस्कार प्रदान केला. तसेच राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून व भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने वरील सन्मान मिळाल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार अपंग सेवक ,वृक्ष मित्र व दीर्घकाल महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणारे डॉ. रवींद्र भोळे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. डॉक्टर रवींद्र बोळे हे शांती सेनेचे पुरस्कार दे व सामाजिक न्यायाचे ऊर्जा स्तोत्र आहेत. जनतेच्या भल्यासाठी निरंतर कार्यरत राहणारा कर्मयोगी म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे होय. पारधी समाजातील लेखक भास्कर भोसले यांनी डॉ. रवींद्र भोळे यांच्या जीवनावर ‘वाळवंटातील समाजसेवी सरोवर’हे चरित्रात्मक पुस्तक लिहून स्वर्गीय शिवशाहीर बाबासाहेब भोसले यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले होते. यातच डॉक्टर रवींद्र भोळे यांची महती लक्षात येईल. राज्यामध्ये अनेक तरुण युवकांनी डॉक्टर रवींद्र बोळे यांचे शिष्यत्व पत्करून व्यसनमुक्तीसाठी तुळशी माळा घातलेल्या आहेत. मॅगसेस विनर, गुजरात रत्न पद्मश्री डॉ.मनीभाई भीमभाई देसाई यांनीही डॉ.रवींद्र भोळे यांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केलेला आहे .