मुंबई । भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानच्या लग्नाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. झहीरच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. झहीर याच महिन्यात सागरिका घाटगे हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे. या दोघांच्याही घरच्यांनी लग्नासाठी संमती दिलीये आणि दोघंही कोर्ट मॅरेज करणार आहे. झहीर आणि सागरिका यांनी आयपीएलच्या 10व्या हंगामादरम्यान साखरपुडा केला होता. दोघांनी ट्विटरवरून साखरपुड्याची माहिती दिली होती. त्यानंतर मुंबईत ग्रँड पार्टीही रंगली होती. या पार्टीत बॉलिवूड जगतातील अनेकांचा सहभाग होता. मीडिया रिपोर्टनुसार झहीर आणि सागरिका हिंदू वा मुस्लीम पद्धतीने विवाह करणार नाहीत तर ते दोघंही कोर्ट मॅरेज करणार आहे. या दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत. झहीर मुस्लीम तर सागरिका हिंदू असल्याने दोघांनी कायदेशीररीत्या एकत्र येत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतलाय.
दरम्यान, सागरिका आणि झहीरच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर झाली नसली, तरी 27 नोव्हेंबरला लग्नाचा स्वागत समारंभ आहे. खुद्द झहीरने ही बातमी दिलीये. हे दोघंही क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री हेझल कीच यांच्या लग्नात एकत्र दिसले होते. सागरिकाने शाहरुख खानच्या चक दे इंडियामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. या सिनेमाती प्रीत सबरवालच्या भूमिकेने तिला नवी ओळख मिळवून दिली. त्यानंतर 2009मध्ये फॉक्स सिनेमातही तिने भूमिका केली होती. 2012मध्ये इमरान हाश्मीसह रश या सिनेमातही तिने मुख्य भूमिका साकारली होती. यासोबतच प्रेमाची गोष्ट या मराठी सिनेमातही ती प्रमुख भूमिकेत होती.