झाडाला बांधली राखी

0

ठाणे : झाडे न तोडता त्यांची रक्षा करूया आणि जास्तीत जास्त झाडे लावूया असे सांगत शिक्षकांनी झाडाला राखी बांधली. हा उपक्रम ठाण्यातील ए.के.जोशी शाळेच्या नर्सरी विभागात राबवण्यात आला. त्यानंतर मुलांनी स्वत: तयार केलेली राखी एकमेकांना बांधून नारळी वडी खाऊन रक्षाबंधन साजरं केलं.