* आडगाव कासोदा रस्त्यावरील घटना
कासोदा – येथून जवळच असलेल्या आडगाव येथील गुलाब बाबाजी पाटील रा आडगाव यांच्या शेताजवळ टिव्हीएस कंपनीची MH19CB4153 या क्रमांकाची मोटारसायकल रसवं ती समोरील निंबाच्या झाडावर आदळल्याने मोटारसायकल चालक शांताराम तोताराम सोनवणे (मापाडी)वय – ६० वर्ष यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. शांताराम सोनवणे हे कृषी उत्पन्न बाजार समितीत मापाडीचे काम करत होते. शांताराम सोनवणे यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंड असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद कासोदा पोलीस स्टेशनला सुरू होती.