झाड कोसळून छोटा शिशूची मुले जखमी

0

मुंबई । घाटकोपर (पूर्व) येथील जोयमॅक्स स्कूलवर एका नारळाचे झाड कोसळल्याने दोन छोटा शिशूमध्ये शिकणारी मुले जखमी झाल्याची घटना घडली. या झाडाचे नुकतेच मुंबई महापालिकेने परिक्षण केले होते. मागील आठवड्यात चेंबूर येथे 57 वर्षीय योगा शिक्षीका झाड कोसळून जखमी झाली होती, परेल येथे दोन व्यक्ती झाड कोसळून जखमी झाले होते. चेंबूर येथील घटनेते योगा शिक्षीका योगाचा वर्ग आटोपून घरी परतत होत्या. त्याच वेळी रस्त्यात त्यांच्यावर झाड कोसळून त्यांचे मान तुटली.