नंदुरबार । तालुक्यातील तिसी भालेर गावातील, परिसरातील व आजूबाजूच्या गावातील आणि नवापूर तालुक्यातील झामट्यावड गावातील, परिसरातील व आजूबाजूच्या गावातील लोकांनी खा.डॉ. हिना गावितांकडे मागणी केली होती कि ह्या गाव व परिसराना जोडणार्या मुख्य रस्त्यावरचे रेल्वेगेट रोज सायंकाळी 6 वाजेनंतर सकाळी 7 वाजेपर्यंत रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात येते.
त्यामुळे त्यापरिसरातील गावांना वैद्यकीय उपचार तसेच शेतीच्या कामासाठी खूप लांबचा फेरा घालावा लागतो. ही अडचण लक्षात घेता, खा.हिना गावितांनी संबंधित अधिकार्यांना झामट्यावड गेट नं 83 व तिसी भालेर गेट नं 95 24 तास सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या, व रेल्वे प्रशासनाने सुध्दा त्याला त्वरित मान्यता देवून दि. 14 पासून 24 तास सुरु केले आहे. त्यामुळे होणारी गैरसोय टळल्यामुळे गावकर्यांनी खा. हिना गावितांचे आभार मानले.