श्रीनगर । आमीर खानच्या बहुचर्चित ‘दंगल’ चित्रपटाची अभिनेत्री झायरा वसीम काश्मीरमधील दल सरोवरमध्ये गाडी कोसळल्याने झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावली आहे.
झायरा वसीम तिच्या गाडीतून जात असताना अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दल सरोवरात कोसळली. ही घटना तात्काळ स्थानिकांच्या नजरेस आल्याने त्यांनी गाडीकडे धाव घेतली. झायरा व तिच्यासोबत प्रवास करणार्यांना वाचवले. या अपघातात झायराला कोणतीही इजा झालेली नाही.