झारखंडमध्ये पाच नक्षलवादी कंठस्थानी !

0

रांची – झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज मंगळवारी पहाटे चकमक उडाली. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन २ एके 47, २ पिस्तूल आणि एक ३०३ रायफल असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

सिंहभूम जिल्ह्याच्या खूंटी- चाईबासा सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. या भागात नक्षलींविरोधात सुरक्षा दलांनी अभियान राबवले होते. शोधमोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.