‘झिरो’च्या विरोधात असलेली याचिका मुंबई हायकोर्टाने केली रद्द

0

मुंबई : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटाचा अडथळा दूर झाला आहे. चित्रपटाविरोधात असलेली याचिका मुंबई हायकोर्टाने रद्द केली आहे. ‘झिरो’ चित्रपटावर शीख समाजाच्या भावाना दुखावल्या गेल्याचा आरोप होता.

‘झिरो’ चित्रपटात असलेली वादग्रस्त दृष्य चित्रपटातून काढून टाकल्याचे निर्मात्याच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदिल दाखवला आहे. हा चित्रपट २१ डिसेंबरला रिलीझ होणार आहे.