मुंबई : नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातील ‘आर्ची’ आणि ‘परशा’ पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. आता हे दोघेही नागराज मंजुळेंच्याच ‘झुंड’ चित्रपटात झळकणार आहेत. लवकरच दोघांच्याही बॉलिवूड पदार्पणाचीही चर्चा आहे.
महानायक अमिताभ बच्चन हे देखील यात भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे अनेक अपडेट्सही त्यांनी चाहत्यांशी शेअर केले आहेत. आता आकाश आणि रिंकू देखील यात एकत्र झळकणार असल्याने या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.