महालक्ष्मी ट्रस्टचे सदस्य वसंत भोगे ; पुण्यतिथीनिमित्त शहरात कार्यक्रम
भुसावळ- महाराष्ट्राच्या जडण-घडणीत झेंडूजी महाराज बेळीकर यांचे योगदान मोठे असून महाराजांनी समाजाच्या हितासाठी निरंतर कार्य केले आहे. महाराजांच्या विचार व आचार यामुळेच सामाजिक एकता टिकून राहिल्याचे प्रतिपादन महालक्ष्मी ट्रस्टचे सदस्य वसंत भोगे यांनी येथे केले. श्री सदगुरु झेंडूजी महाराज बेळीकर लेवा पाटीदार समाज संस्था व श्री महालक्ष्मी ग्रुप तर्फे सालाबादाप्रमाणे बुधवारी दुपारी राम मंदिर वार्ड येथील अनिल पाटील यांच्या निवासस्थानी येथे झालेल्या आद्य गुरु वारकरी संप्रदायाची प्रणेते श्री सद्गुरू झेंडूजी महाराज बेळीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष सुरेश बर्हाटे, सचिव मनोहर बर्हाटे, वसंत भोगे, झेंडूजी महाराज बेळीकर संस्थेचे अध्यक्ष दिनेश भंगाळे, अरुण धांडे, प्रा.धीरज पाटील, सागर वाघोडे, चंद्रकांत पाटील, प्रकाश पाटील, लीलाधर भारंबे, अरविंद कुरकुरे, मधुकर लोखंडे, प्रकाश चौधरी, वासुदेव पाटील, रवींद्र पाटील, किशोर पाटील, दीपक झांबरे, संदीप लोखंडे, धर्मराज देवकर, नितीन लोखंडे, मुकुंदा बोरोले, लतेश भारंबे, संदीप लोखंडे, नितीन इंगळे, रूपचंद भंगाळे, जितेंद्र वराडे, नारायण पाटील, प्रल्हाद नेहेते, जयेश झांबरे, अमोल पाटील, विजय पाटील, दीपक बर्हाटे उपस्थित होते.
वधू-वर परीचय पुस्तिकेबाबत नियोजन
श्री सदगुरू झेंडुजी महाराज बेळीकर लेवा पाटीदार समाज संस्था,भुसावळ मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारे वार्षिक स्नेहसंमेलन व वधू-वर परीचय पुस्तिका नियोजन संदर्भात अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. परीचय पत्रक प्रकाशनाच्या जबाबदारी वाटून देण्यात आली. लेवा समाजातील उपवर -वधू – वरांचे विवाह जुळविण्याकरिता सहाय्यभूत व्हावे म्हणून गेली अनेक वर्षे मंडळ व महालक्ष्मी ट्रस्ट कार्यरत असलेला वधू वर सूचक मंडळाच्या माध्यमातून विवाह जुळविण्याचे फार मोठे सामाजिक कार्य मंडळाने अविरत चालू ठेवले आहे. वधू-वर परिचय पुस्तकाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्यामुळे मंडळाचा हा उपक्रम किंवा वधू वर सूचक व्यवस्था किती आवश्यक आहे याची साक्ष पटते, असे अध्यक्ष दिनेश भंगाळे यांनी सांगितले.