जळगाव । राज्य परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी 13 रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
गुरुवारी 15 रोजी जिल्हा परिषदेतील शाहु महाराज सभागृहात शहरातील झेडपी विद्यानिकेतन शाळेतील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर, प्रकल्प संचालक मिलींद बागडे, विद्यानिकेतन शाळेचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.