झेडपी सदस्यांमध्ये संभ्रमावस्था

0

जळगाव। जिल्हा परिषदेतील कार्यकारीणीची निवड होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर महिन्याभराने जिल्हा परिषदेतील विविध समितींची निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी रंगली नाही तेवढी नाट्यमय घडामोडी विषय समिती सदस्य निवडतांना भाजपा पक्षांतर्गत घडली. महत्वाच्या समितीसाठी अनेक इच्छुक असल्याने समिती स्थापनेत स्पर्धा निर्माण झाली होती. अखेर अध्यक्षांनी बँकडेटेड समिती स्थापल्याची दाखवून निवड जाहीर केली. मात्र निवडीच्या 20 दिवसानंतरही निवडीचा इतिवृत्त प्रसिध्द करण्यात आला नसल्याने सदस्यांनाच आपल्याला कोणत्या विषय समिती स्थान देण्यात आलेला आहे याबाबत माहिती नाही. सदस्यांनी इतिवृत्तीचा प्रत मिळावा यासाठी मागणी केली असून त्यांना प्रत देण्यात आले नसल्याने खुद्द भाजपचे व माजी मंत्री एकनाथराव खडसे समर्थक असलेले चांगदेव रूईखेड गाटातील सदस्य जयपाल बोदडे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहेत नसल्याचे स्थिती आहे.

खडसे गटावर अन्याय : जिल्हा परिषदेची नवनियुक्त कार्यकारीणी जाहीर झाली आहे. भाजपात खडसे व महाजन असे दोन गट असल्याचे सर्वश्रृत आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन व माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्यात महत्त्वाच्या पदासाठी रस्सीखेच सुरु असते. जिल्हा परिषद विषय समिती निवडतांना खडसे गटांच्या सदस्यांना विश्‍वासात घेतले नसून मर्जी विरोधातील समितीत निवड झाल्याने अन्याय झाल्याचा गुप्त सुर खडसे गटातुन उमटत आहे.

इच्छा नसलेला समितीत : जिल्हा परिषदेतील सर्व सदस्यांना विषय समितीत सामावुन घेण्यात येते. जिल्हा परिषदेत एकुण 10 विषय समिती असून अध्यक्ष उपाध्यक्ष व सभापती वगळता पंचायत समिती सभापतीसह 76 सदस्यांना यात स्थान देण्यात येते. सदस्यांना हवी असलेल्या समितीत स्थान मिळाला नसल्याने अनेक सदस्य समितीच्या बैठकीला हजर राहत नाही.

सीईओंनी मागविले मार्गदर्शन
गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्याकडे असलेले बांधकाम व अर्थ समिती सभापतीपद काढून घेण्यात आले आहे. आगोदर खातेवाटप करण्यात आलेल्या महिला व बालकल्याण समिती सभापती रजनी चव्हाण यांच्याकडे बांधकाम समिती सभापतीपद देण्यात आल्याने ही निवड नियमबाह्य असल्याचा ठपका सभागृह सचिव नंदकुमार वाणी यांनी ठेवला आहे. झेडपी सीईओ यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडून या प्रश्‍नी मार्गदर्शन मागविले आहे. नियमबाह्य आढळल्यास समिती बरखास्त होणार आहे.

झेडपीत हुकुमशाही
जिल्हा परिषदेत पहिल्यांदा भाजपाने एकहाती सत्ता मिळविली आहे. यातुन महत्वाच्या पदासाठी भाजपात सत्ता संघर्ष सुरु झाल्याचेही दिसून आले. खातेवाटप नियमबाहयपणे झाले असल्याने लवकरच आपण न्यायालयात जावून दाद मागणार आहे. तसेच आपण कोणत्या समितीत आहे,हे आपल्यालाच माहित नाही. जिल्हा परिषदेत सर्वत्र गलथानपणा सुरू असल्याचे आरोप बोदडे यांनी केले. जिल्हा परिषदेत भाजपाच्या सदस्यांमध्येच अंतर्गत धुसफुस सुरू झाल्याचे यावरून दिसून येते.