Death of a child sitting on a swing due to jaundice : Shocking incident in Amalner अमळनेर : झोक्यात बसून अभ्यास करताना गळ्याला पीळ बसल्याने 14 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. रविवार, 20 नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजता ही घटना घडली. वेदांत संदीप पाटील (14, मुंदडा नगर, अमळनेर) असे मयत बालकाचे नाव आहे.
झोक्यात पीळ बसल्याने मृत्यू
वेदांत हा वरच्या मजल्यावर झोक्यात बसून अभ्यास करण्यासाठी गेला असता झोक्याला पीळ देत असतानाच त्याचा तोल जावून तो झोक्यातून सटकला. त्याच्या गळ्याला झोक्याचा पीळ बसल्याने त्याचा मृत्यू ओढवला.
पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
वेदांत यास नजीकच्या पद्मश्री हॉस्पीटलमधे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीअंती तो मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे तपास करीत आहेत.