Suicide of a 28-Year-Old Youth of Nashirabad Village नशिराबाद : घरात कुणीही नसताना गावातील 28 वर्षीय तरुणाने झोक्याच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार, 27 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. विनोद पंढरी बिर्हाडे (28, भवानी नगर, नशिराबाद) असे मयत तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
विनोद बिर्हाडे हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला होता. गुरूवार, 27 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12 वाजता घरी कुणीही नसतांना घरातील झोक्याच्या दोरीने तरुणाने राहत्या घरात गळफास घेतला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. शेजारी राहणार्या नागरीकांनी तातडीने धाव घेवून मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल नूर खान करीत आहे.