जळगाव। देशभरातून आलेले रेल्वे कर्मचारी प्रशिक्षणार्थीचा उत्स्फूर्त सहभाग व त्यांनी केलेले रक्तदान हे जीवंत पणाचे लक्षण असून, दर तीन महिन्यांनी वेळोवेळी रक्तदान करून रुग्णांची रक्तपिशवीची गरज भागवावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले. झोनल रेल्वे ट्रेनिंग इंस्टीट्यूट आयोजित महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अरुण धार्मिक उपस्थितीत उद्घाटन झाले. झोनल रेल्वे ट्रेनिंग इंस्टीट्यूटतर्फे भुसावळ येथे सहायक, लोकोपायलट, लोकोपायलट गार्ड, स्टेशन मास्टर, टिकीट कलेक्टर, प्रशिक्षणार्थी यांनी 334 रक्तपिशवींचे संकलन केले.
यांची होती उपस्थिती
प्राचार्य के.पी. कृष्णन, राकेश मल्होत्रा,डॉ. प्रसन्न कुमार रेदासनी, राजेश यावलकर, जी.टी. महाजन, ओमप्रकाश, डि.एच. जंगले, एस.डी. मीणा, ए.के. सिंहा, वि.के. दुबे, डी.के. सोनी, सुरेंद्र प्रसाद, नविन चंद्रा, बी.एल. कॅथवास उपस्थित होते. डॉ.प्रकाश संघवी, डॉ.प्रकाश जैन, डॉ.अनिल चौधरी, लक्ष्मण तिवारी, टी.आर.जोशी, उज्वला वर्मा, राजेंद्र कोळी, निता नेमाडे, अनुशी लुंड, नरेंद्र पन्हाळे, रविंद्र जाधव, सुनिता वाघ, उमाकांत शिंपी, विरेंद्र बाविस्कर, संजय साळुंखे, अन्वर खान आदींनी परिश्रम घेतले.