चोपडा । सातपुडाचा सिमेलगत असलेला मध्येप्रदेशातून आदिवासी बांधव नवाड काढण्याचा उद्देशाने वैजापुर वनपरिक्षेत्रात एकुण 22 कुटूंब अतिक्रमण करून वास्तव्य करीत होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी मंगळवार 7 नोहेंबर रोजी वैजापूर वनपरिक्षेत्रातील मौजे खार्यापाडाव पश्चिम नियतक्षेत्रातील कक्ष क्र. 244 मधील राखीव वनातील मध्यप्रदेशातील 22 अतिक्रमण धारकांच्या बेकायदेशीर झोपडयांचे अतिक्रमण जिसीबीचा सहाय्याने पोलीस व एसआरपीचा बंदोबस्त लावण्यात काढण्यात आले. वनविभागाचे 100च्या जवळपास कर्मचारी यावेळी उपस्थित होते. पोलीस व एसआरपीचे 50 हत्यार बंद जवानांनी बंदोबस्तात सहभाग नोंदविला. यावेळी पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील, सहाय्यक वनसंरक्षक एच.पवार. वनपरीक्षेञ आधिकारी एम.बी. पाटील, पी.बी. पाटील, एस.डी. सांळुखे, एम.डी. राऊत हे उपस्थित होते.