झोपेवरील असंख्य अभ्यास प्रकल्पांचा निष्कर्ष असा असतो की पुरेशी झोप जीवनात बदल घडविणारी ठरते. आता शास्त्रज्ञ झोप तुमच्या बाळांची शिकण्याची क्षमता कशी वाढवते हे सांगत आहेत. जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन कॉग्नटिव्ह अँड ब्रेन सायन्सेस संस्थेतील शास्त्रज्ञांनी साधार दाखवून दिले आहे की सहा ते आठ महिन्यांची बाळे कण्यासाठी विविध गोष्टींचा अन्वय चांगल्या झोपेमुळे लावू शकतात. अभ्यासासाठी निवडलेल्या बाळांना काही वस्तुंची ओळख करून देण्यात आली. नंतर तशाच वस्तु परंतु वेगळा रंग आणि आकाराच्या देण्यात आल्या. आधी बाळांना वस्तु आणि त्यांचे नाव यांचा अन्वय काही लावता आला नाही. काही वेळ डुलकी काढल्यावर त्यांची वस्तु आणि रंग किंवा आकार यांच्याशी संबंध लावण्याची क्षमता वाढली. त्यांनी वस्तु बरोबर वेगळ्या केल्या. संशोधकांचे म्हणणे आहे की बाळांनी सर्व आकलन केले आणि झोपेत त्यांचे ज्ञान पक्के झाले.