मुक्ताईनगर- तालुक्यातील टाकळी येथे चोरट्यांनी कुटुंब लग्नाला गेल्याची संधी साधत दोन लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. टाकळी येथील मगन काशिनाथ राठोड हे जळगाव येथे गेल्याची तर कुटुंबातील सदस्य खंडव्याला बस्त्यासाठी गेल्याने घराला कुलूप असल्याची चोरट्यांनी संधी साधली. घराचा कडी-कोयंडा तोडत चोरट्यांनी कपाटातील 52.45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट व चेन मिळून दोन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. रविवारी डीवायएसपी संजय देशमुख, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक नीलेश सोळंके यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले मात्र काहीही उपयोग झाला नाही.