टाकळी प्र.चा. येथे रक्तगट तपासणी शिबीर

0

लाडशाखीय वाणी समाज मंडळातर्फे शिबीराचे आयोजन
चाळीसगाव – शहरातील भडगांव रोड स्थित स्वामी समर्थ क्लिनिकमध्ये वाणी समाजाच्या वतीने मोफत रक्तगट तपासणी शिबीराचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिक्षक डॉ.बी.पी.बाविस्कर, डॉ.स्वाती बाविस्कर, डॉ.चेतना कोतकर यांच्याहस्ते १४ ऑक्टोंबर रोजी करण्यात आले. लाडशाखीय वाणी समाजाच्या राष्ट्रीय महाआधिवेशनाच्या औचित्यपर समाज बांधवांनी दिलेला प्रतिसाद उत्तम राहिला असून रक्तातील रक्तद्रव्य, तांबडया पेशी, पांढऱ्‍या पेशींची संख्या व प्रमाण तपासले जात आहे. यासोबतच रक्तातील प्रथिने, साखर, स्निग्ध पदार्थ क्षार, प्राणवायू, यूरिया, बिलिरुबीन घटके लक्षात येतात.रक्तातल्या प्रतिघटकांची पातळी आणि प्रकार याबाबत सर्वांनी जागरुक असायला हवे, असे डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी कथन केले.

४००-५०० समाजबांधवांनी घेतला लाभ
सर्वत्र तालुक्यात जनगणनेची नोंदणी केली जात असतांना त्यात विहीत नमुद अर्जातील माहितीत रक्तगटाची माहिती करणे अनिवार्य असून यात अनेक समाजबांधवांना याबाबतीत ज्ञात नसल्याकारणाने अर्ज भरण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते विकास बागड आणि हरिश्चंद्र पिंगळे यांनी शहरातील भडगांव रोड स्थित डॉ.स्वाती बाविस्कर यांच्या स्वामी समर्थ क्लिनिकमध्ये रक्तगट तपासणी शिबीर घेण्यात आले.यावेळी जवळपास ४०० ते ५०० समाजबांधवांनी लाभ घेतला. यावेळी रेखा शेंडे, अनिता बागड, शुभांगी कोठावदे, भूषण कोठावदे, अमोल पाखले, योगेश भोकरे, स्वप्निल कोतकर, दत्तात्रय मालपुरे, पुरुषोत्तम ब्राह्मणकर, दिपक शिनकर आदीसह समाजबांधव उपस्थित होते. तेजस मेडिकलचे संचालक किरण मराठे, सोनल बागुल, अश्विन बैरागी, चेतन निकम, रवींद्र सोनवणे यांनी परिश्रम घेतले.