जामनेर : तालुक्यातील टाकळी शिवारातील शेतातील घरातून सोन्याच्या दागिण्यांसह रोकड मिळून दोन लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला. जामनेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांच्या पथ्थ्यावर
सुरेश भरत परदेशी (40, टाकळी, ता.जामनेर) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे टाकळी शविारातील शेत गट नंतर 12/1 मध्ये शेत असून त्यात त्यांनी घरही बांधले आहे. शुक्रवार, 20 मे रोजी रात्री 10 वाजता सुरेश परदेशी यांनी शेतातील घर बंद करून टाकळी गाठले. अज्ञात चोरट्यांनी संधी साधत शेतातील बंद घर फोडून घरातील कपाटात ठेवलेली 70 हजारांची रोकड तसेच एक लाख 35 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने मिळून दोन लाख पाच हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी सुरेश परदेशी यांनी जामनेर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड करीत आहे.