टाटा पॉवर कंपनीचे धरणग्रस्तांच्या मागण्यांकडे होते दुर्लक्ष

0
धरणग्रस्तांसाठी विशेष करून महिलांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी सुरू केली मावळ दूध उत्पादक कंपनी 
ठोकळवाडी धरणग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा
टाकवे बुद्रुक : आंदर मावळातील ठोकळवाडी धरणग्रस्तांसाठी विशेष करून महिलांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी टाटा पॉवर कंपनीने तीन वर्षांपुर्वी मावळ दूध उत्पादक कंपनी सुरू केली होती. मात्र दूध उत्पादक कंपनीमध्ये अनागोंदी कारभार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कंपनी सुरू करताना सुमारे 931 महिला सभासदांकडून घेतलेले प्रत्येकी 1150 रुपयांच्या सभासद वर्गणीचे काय झाले, प्रकल्प दुर्गम भागात उभारण्याचे ठरले असताना ऐनवेळी टाकवे औद्योगिक वसाहतीमध्ये हलविला. याशिवाय काही सभासदांना हाताशी धरून प्रकल्पासाठी काढलेले लाखो रुपयांचे कर्ज अशा अनेक बाबी यानिमित्ताने चव्हाट्यावर आल्या आहेत. या संदर्भात शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, भरत लष्करी, छगन लष्करी, दशरथ वाडेकर, योगेश खांडभोर अनेक सभासदांनी टाटा पावर कंपनीकडे विविध मागण्या केल्या आहेत. तसेच मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदर मावळातील ठोकळवाडी धरणात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
विरोध दर्शवूनही काम सुरू 
शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांनी सांगितले की, टाटाच्या अधिकार्‍यांनी डेअरीचे निवडक संचालक हाताशी धरून हा प्रकल्प टाकवे बुद्रुक या औद्योगिक वसाहतीत हलवला. अनेकांनी विरोध दर्शविला असताना या प्रकल्पाचे कामही सुरू झाले. तसेच या कंपनीच्या नावाखाली महिला सभासदांकडून दर महिना 50 रुपये बचत म्हणून घेण्यात येत आहे. मात्र त्याचा हिशोब ठेवण्यात आला नाही. या प्रकल्प उभारण्यासाठी सात कोटी 85 लाख रुपये कर्ज काढून संपूर्ण महिला सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप यांनी केला आहे. आंदर माळातील ठोकळवाडी धरणग्रस्तांसाठी विशेष करून महिलांसाठी स्वयंरोजगार निर्मितीचे आश्‍वासन देत टाटा पावर कंपनीच्या अधिकार्‍यांनी 2015 मध्ये धरणग्रस्त महिलांना एकत्रित करीत मावळ दूध उत्पादन कंपनीची स्थापना केली. या कंपनीत सुमारे 931 सभासद असून, सुरुवातीला त्यांच्याकडून 1150 रुपये सभासद वर्गणी म्हणून घेण्यात
प्रस्ताव महिला सभासदांसमोर
टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी अनिल करवटकर यांनी सांगितले की, मावळ दूध उत्पादक कंपनीचे चार हजार शेअर्स वाढविण्याचा प्रस्ताव महिला सभासदांसमोर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला ज्यांची सहमती असेल, त्यांनी सहमती कळवावी, असे आवाहन कळविण्यात आले आहे. त्यामुळे जर कोणी नाही आले तर त्यात कंपनीची चूक काय. आम्ही कंपनीच्या वाढीसाठी शेअर्स वाढवित आहोत. ज्यातून कंपनीला मोठे करता येईल.