‘टिचर्स प्रायव्हेटली’ ‘व्हॉटस्अप गृपव्दारे मृत शिक्षकाच्या कुटुंबियांना मदत

0

पिंपळनेर । साक्री व परिसरातील प्राथमिक शिक्षकांचा टिचर्स प्रायव्हेटली नावाचा व्हॉॅटसपगृप आहे. या गृपने आत्तापर्यंत शिक्षकांसाठी तीन वेेेळा निधी संकलीत करून मदत केली आहे. खंबाळे (ता. शिरपुर) कै.सुरेश कृष्णा मेहता (मोहिते) हे 2004 पासून वस्ती शाळा शिक्षक होते. नंतर मार्च 2014 पासून ते जिल्हा परिषदमध्ये वर्ग करण्यात आले. मात्र, वयाच्या 42व्या वर्षी दुर्धर आजारामुळे त्यांचे निधन झाल्याने शिक्षकांच्या व्हॉटस्ग्रृपद्वारे त्यांच्या कुटुबियांना आर्थिक मदत करण्यात आली. त्यांच्या पश्‍चात पत्नी लताबाई सुरेश मोहिते, मुल धनंजय सुरेश मोहिते (वय13), गौतम सुरेश मोहिते (वय 11) तसेच आई, लहान भाऊ असा परिवार आहे.

व्हॉटस्अप गृ्रपव्दारे मदतीचे आवाहन
कै.सुरेश कृष्णा मेहता(मोहिते) या वस्तीशाळा शिक्षक ता.शिरपुर यांच्या अचानक निधनानंतर नविन पेंशन अंतर्गत शासकीय कोणतीच मदत मिळत नसल्याने व कोणताही आधार नसल्याने अडचणीत सापडलेल्या कुटुंबासाठी साक्री तालुक्यातील काही प्राथ.शिक्षक बांधवांनी व्हॉॅट्सअप गृपच्या माध्यमातुन मदतीसाठी अवाहन केले होते. या आवाहनानुसार साक्री तालुक्यातील 258 शिक्षक व समाज बांधवांनी-भगीनींनी स्वच्छने मदतनिधी जमा केला. व्हॉट्सअप माध्यमातून 1 लाख 30 हजार 250 रूपये जमा करून त्याचा धनादेश पिडीत कुटुंबास देऊन मदतीचा हात दिला. व्हॉट्सअप गृपच्या माध्यमातून अशा प्रकारची मदतनीधी उभारुन साक्री तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी समाजापुढे एक आदर्श घातला आहे. निधी संकलनासाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र नांदे, तालुका अध्यक्ष जगदिश पाटील यांनी मार्गदर्शन केले.

वेळोवेळी केली मदत
या मदतनीधीसाठी ींशरलहशी िीर्ळींशींश्रू, पश्‍चीम पट्टा शिक्षक परीषद गृप, साक्री शिक्षक परीषद गृप, जुनी पेंशन हक्क संघटन गृप, आदी.व्हॉट्सअप गृपच्या माध्यमातुन मदतीचे अवाहन केले होते. तसेच या गृपन अविनाश इला वळवी या शिक्षकांचा अपघात झाल्याने दवाखान्याच्या जास्तीच्या खर्चासाठी 35000 रु मदतनिधी दिली. अमरावती येथे शिक्षक विजय नकाशे यांनी आत्महत्या केल्याने 1,06,411 रूपयाचा धनादेश त्यांच्या कुटुंबीयांना दिला होता.