टीका कशी पचवायची ते माझ्याकडून शिका

0

मुंबई । महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष संपूर्ण भारतात पोहोचवला आहे. ईशान्य भारतातील नागालँड, मेघालय, त्रिपुरा या राज्यांतील निवडणुका माझा पक्ष स्वबळावर लढत आहे. माझा पक्ष जिल्ह्याजिल्ह्यांत रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन घडवतो. समाज म्हणजे काय माझ्या पक्षासोबत जो प्रचंड जनसमुदाय आहे तो काय समाज नाही का? असा टीकाकारांना सवाल करून टीका पचवायची कशी, ती माझ्याकडून शिका, असा टोला राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांना लगावला.

ऐक्य कायमस्वरूपाचे असावे
चेंबूर पी.एल. लोखंडे मार्ग येथे प्रियदर्शी बुद्धविहाराच्या प्रांगणात आंबेडकरी जनतेच्या वतीने आठवले यांचा प्रियदर्शी नेता म्हणून भव्य सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना आठवले बोलत होते. यावेळी आंबेडकरी जनतेने प्रचंड गर्दी केली होती. रिपब्लिकन पक्षाच्या हिरकमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त प्रियदर्शी नेते रामदास आठवले सत्कार सोहळ्याचे आयोजन रिपाइंचे तानाजी गायकवाड यांनी केले होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. रिपब्लिकन ऐक्याला आपण तयार आहोत. मात्र, रिपाइं ऐक्य कायमस्वरूपी टिकणारे असावे. त्यातील निर्णय हे बहुमताने घेतले जावेत.