टीसीआय कंपनीत माथाडी ठेक्यावरून धुमशान

0
वाहनांची तोडफोड; सोळा जणांना अटक
चाकण : चाकण औद्योगिक वसाहतीतील रोहकल हद्दीतील टीसीआय कंपनीत माथाडी ठेका मिळविण्यासाठी आलेल्या जमावाने कामगारांना बाहेर हाकलून कंपनीत माल चढ-उतारासाठी आलेल्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी (दि.16) दुपारी साडेबाराचे सुमरास घडली. या प्रकरणी वडगाव मावळ, चिंचवड, निगडी परिसरातील सोळा जणांवर रात्री उशिरा चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवाजी महादेव वाटेकर ( वय 64, रा. काळूस, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संग्राम सर्जेराव पाटील (रा. आंबेगाव), रुपेश शंकरराव म्हासाळकर (रा. वडगाव मावळ), यशपाक किसन चौधरी (रा. निगडी), राजू भानुसरे (रा. शीलाटणे), विलास साबळे, कृष्णा पवार, अविनाश म्हासाळकर, विनायक मोडवे, शिवानंद कटनाईक, नवनाथ शिवेकर, प्रदीप कड, किरण पवार, बालाजी पवार (सर्व रा.वडगाव मावळ), देविदास कैलास देवकाते (रा. चिंचवड) या सोळा जणांवर भा.दं. वि.कलम 452,143,147,149,504,506 आदी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. पुढील तपास सुरु आहे.