चाळीसगाव । एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र ललित कला प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत चित्रकला, गायन, वादन, नृत्य, अभिनय, ललित लेखन या कलांचा समावेश होता. यात चाळीसगाव शहरातील आ.बं.मुलांचे हायस्कुलने यश संपादन केले आहे. चैतन्य अनंत सातपुते या विद्यार्थ्यांला शंभरपैकी 96 गुण, तेजल संजय नानकर याला 95 गुण मिळाले आहे. शिवप्रसाद सोनवणे , ऋषीकेश मुंढे, प्रफ्फुल पाटील, जयेश बाविस्कर, वैभव व्यवहारे, आर्यन जेठवा, निसर्ग सातपुते, ओंकार गोरे, इंद्रजित भोसले, प्रथमेश पाटील, सिध्दांत जाधव, मनोज राठोड, हर्षल चंद्रात्रे, ऋषीकेश सोनार, जयेश बाविस्कर, गौरव शिरसाठ आदींनी यात यश मिळविले आहे.