पिंपरीः राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश टेकावडे यांच्या खून प्रकरणाला न्यायालयाच्या एका आदेशामुळे कलाटणी मिळाली आहे. पिंपरीतील तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन विधाते व पिंपरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. ए. मुजावर यांची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले असून त्याचा अहवाल 11 जुलै 2018 पर्यंत न्यायालयाला सादर करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले असल्याचे सुर्योद्य शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
माजी नगरसेवक टेकावडे यांचा 3 सप्टेंबर 2015 ला खून झाला होता. या प्रकरणी बाबू उर्फ सुर्योदय शेखर शेट्टी यांना अटक झाली होती. दरम्यान, या खून प्रकरणात माझा काहीही संबंध नसल्याचा दावा शेट्टी यांनी केला आहे. त्यांनी या खून प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मोहन विधाते व एस. ए. मुजावर यांनी स्थानिक राजकारण्यांच्या सांगण्यानुसार या प्रकरणात आपल्याला गोवल्याचे शेट्टी यांचे म्हणणे होते.
खंडपीठापसमोर झाली सुनावणी
या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि रेवती मोरे-डोरे यांच्या खंडपीठापसमोर सुनावणी झाली. त्यांच्या खंडपीठाने टेकावडे खून प्रकरणात निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन विधाते आणि तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरिक्षक एस. ए. मुजावर यांची चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. हे अधिकारी दोषी अढळल्यास त्यांच्यावर काय कारवाई करणार, याचा अहवाल न्यायालयाने 11 जुलै 2018 पर्यंत सागर करण्यासाठी न्यायालयाने सांगितले आहे, असे सुर्योदय शेट्टी यांनी सांगितले.