टेकवाडे येथे पर्यावरण रक्षणासाठी ‘झाडांना बांधू राखी’ !

0

शिरपूर । तालुक्यातील टेकवाडे येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेत झाडांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. इ.1ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील झाडाची पुजा करुन राखी बांधली.व झाडांच्या रक्षणासाठी संकल्प घेतला.

यावेळी रक्षाबंधन व झाडांचे रक्षणासाठी जबाबदारी चे महत्त्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक बी.आर.महाजन यांनी सांगितले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोतिलाल पटेल उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक महाजन यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होणेसाठी किशोर सोनवणे ,रुपेश कुलकर्णी बी.एल पावरा, एस.जे.सोनार, अभिजीत कोळी, रोहीत पावरा यांनी सहकार्य केले.