“टेक्नोबॅर्श 2019” राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा संपन्न

0
पिंपरी चिंचवड : विद्यार्थ्यांच्या संशोधन व स्पर्धाप्रवृतीला चालना देण्यासाठी गेनबा सोपानराव मोझे अभियांत्रिकी महाविद्यालय बालेबाडी तर्फे “टेक्नोबॅर्श2019” यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दि. 16 व 17 जानेवारी रोजी या स्पर्धा पार पडल्या. कार्यक्रमाच्या उद्घाटन  प्रसंगी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भंडारी, एन.सी.एल. पुणे हे प्रमुख अतिथी होते. मुलांनी कशा प्रकारे आपल्या संशोधनावर भर दयावा व दिशा ठरवावी हे मार्गदर्शन त्यांनी केले.
स्पर्धेत सावित्रीमाई फुले विद्यापिठातील अभियांत्रिकी व इतर महाविद्यालय व राष्ट्रीय स्तरावरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धेला उत्तुंग प्रतिसाद मिळाला. त्यात 500 हून अधिक सहाभागाची नोंद कार्यक्रमात झाली.
बक्षिसे

प्रत्येक स्पर्धेत 2 पारितोषिक देण्यात आली. प्रथम पारितोषिक 3000 रुपये, प्रशस्तीपत्र व मानचिन्ह. तसेच द्वितीय पारितोषिक 2000 रुपये, प्रशस्तीपत्र व मानचिन्ह. प्रत्येक भाग घेतलेल्या स्पर्धकाला प्रशस्तीपत्र देण्यात आले. बक्षिस समारंभाचे प्रमुख पाहुणे हे टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर महेश शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. शिंदे यांनी इंडस्ट्री मधिल कार्यप्रणाली बद्दल माहिती दिली. तसेच इंडस्ट्री मध्ये प्रात्याक्षिक ज्ञान किती महत्वाचे आहे. तेही समजावून सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा महाविद्यालयीन तसेच इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खुप झाला. “टेक्नोबॅर्श2019” आयोजित करण्यासाठी संस्थेचे संस्थापक रामभाऊ मोझे व प्राचार्य डॉ. अभिजीत औटी यांनी मार्गदर्शन केल्याने विद्यार्थ्यांमधील तांत्रिक गूणांना वाव मिळाला.