अमेरिका । इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत जागतिक रँकिंगमधील अव्वल 50पैकी 46 टेनिसपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.याचबरोबर या स्पर्धेचा ड्रॉ पाहून या टेनिसपटूच्या डोक्यावरील आठ्यांचे जाळे अधिक गडद झाले आहे.यंदा जानेवारीत पार पडलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यामुळे रॉजर फेडरर फॉर्मात आल्याचे म्हटले जाते आहे. यामुळे सहाजिकच खुद्द फेडररसह त्याचे चाहतेदेखील सुखावले आहेत.ड्रॉ पाहिल्यानंतर फेडररवरील दडपण किंचीत वाढले असले तरी गेल्या 13 इंडियन वेल्समध्ये 12 वेळा जेतेपदे पटकावली आहेत ती खुद्द फेडरर, नदाल व जोकोविच या तिघांनीच. तेव्हा खरेतर इतर टेनिसपटूंनी जेतेपदासाठी जास्त मेहनत घ्यायला हवी. या स्पर्धेचे जेतेपद पटकवायचे असेल, तर त्याला उपांत्यपूर्व फेरीतच ही स्पर्धा तीनवेळा जिंकणार्या नोव्हाक जोकोविच किंवा स्पेनच्या पाचव्या सीडेड रफाएल नदाल यांचा सामना करावा लागू शकतो.हे ड्रॉ पाहून अव्वल सीडेड अँडी मरेची प्रतिक्रिया होतीः ‘जबरदस्त… जबरदस्त ड्रॉ आहे या स्पर्धेचा..’. मरे मात्र काहीशा निर्धास्त आहे; कारण त्याचा गट काहीसा सोपा आहे. मोठ्या खेळाडू भडीमार असतांना माजी अमेरिकन ओपन विजेता ज्युआन मार्टिन डेल पोट्रो व स्पेनचा फर्नांडो व्हर्डास्को ही मंडळीदेखील आव्हान द्यायला आहेतच. ऑस्ट्रेलियाच्या निक किरिगिओसने तोदेखील स्पर्धेत आहे. याशिवाय अॅलेक्झँडर झ्वेरेव्हसारखा गुणी तरुण टेनिसपटू या स्थिरावलेल्या स्टार्सना कडवी टक्कर देतो.
या गटातील स्टार टेनिसपटू पुढे दिसणार नाही आम्ही एकमेकांना सुरूवातीच्या फेर्यामध्ये पराभूत करू असे फेडरर म्हणाला.हा ड्रा लक्षवेधी आहे.याठिकाणी पोहचल्यावर मला संदेश मिळाला की,दुदी सेला व स्टीफन रॉबर्ट याच्यापैकी प्रतिस्पर्धी मात्र तो संदे मला काही रिलॅक्स करून गेला.मला याबाबत फार काही वाटत नाही. आतापर्यंतच्या कारकिर्दीत मी बरेच ड्रॉ पाहिले आहेत. यापेक्षाही कठीण ड्रॉचा सामना करत तावून सुलाखून निघालो आहे. तसेही कडवे प्रतिस्पर्धी लवकर लाभले तर पुढील फेर्या सोप्या होतील.गेल्यावर्षी दुखापती व सूर हरपल्याने नदाल व फेडरर यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामी त्यांचे रँकिंग खालावले.