टेम्पोखाली आल्याने एकजण ठार

0

निगडी : टेम्पो मागे घेताना रस्त्यावरील एकजण ठार झाला. विरेंद्र पुनवासी गौंड (वय 46, रा. चिखली) असे त्यांचे नाव आहे. बुधवारी (दि. 25) दुपारी तीनच्या सुमारास चिखलीमधील रिव्हर सोसायटी जवळ ही घटना टेम्पो चालक अप्पा किसन मोटे (वय 36, रा. मोरेवस्ती, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टेम्पो मागे घेताना अपघात
निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटे याने त्याचा टेम्पो रिव्हर सोसायटीच्या बाजूला असणार्‍या मोकळ्या जागेत उभा केला होता. टेम्पोच्या मागे गौंड झोपले होते. दुपारी तीनच्या सुमारास मोटे याने न पाहता टेम्पो मागे घेतला. त्यावेळी झोपलेल्या गौंड यांच्या डोक्यावरून टेम्पोचे चाक गेले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ भोये तपास करीत आहेत.