टेस्ट ट्यूब बेबी संकल्पना रामायणापासूनच; युपीच्या उपमुख्यमंत्र्यांचा अजब शोध

0

लखनौ-भाजपचे दिग्गज नेते तथा जबाबदारीच्या पदावर कार्यरत असणारे नेते आपल्या व्यक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. यापूर्वी त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब देव यांनी इंटरनेट हे महाभारत काळापासून अस्तित्वात असावे म्हणून महाभारतातील उद्धाबब्त संजय यांना रणांगणावरील सर्व माहिती कळायची असे व्यक्तव्य करून अजब-गजब शोध लावला होता. हे प्रकरण ताजे असतांनाच उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी टेस्टट्यूब बेबी संकल्पना रामायण काळापासून अस्तित्वात असल्याचे विधान केले आहे. लोक म्हणतात की सीता ही मातीच्या मानेतून जन्माला आली आहे. याचा अर्थ रामायणकाळात टेस्टट्यूब बेबी संकल्पना अस्तित्वात होती असा दावा त्यांनी केला आहे.