टोलनाके निशुल्क करण्याचे भाजयुमोचे निवेदन

0

धुळे । येथील भारतीय जनता युवा मोर्चा धुळे महानगरतर्फे खान्देशची कुलस्वामिनी आई सप्तश्रृंगी मातेची यात्रा सुरु होणार आहे. यायात्रेसाठी भाविकांकरिता व भविकांसाठी भंडारा व इतर काही गोष्टींकरिता जे वाहन वापरण्यात येते त्या वाहनांचा वाहतुकीसाठी धुळे हद्दीत असलेले टोल नाके म्हणजेच अवधान टोल व सोनगिर टोल हे यात्रेचा कालावधी पर्यंत निशुल्क करावे यासाठी निवेदन देण्यात आले. सदर निवेदन टोल व्यवस्थापकांना दिल्या नंतर युवा मोर्चाची मागणी तात्काळ मान्य करण्यात करण्यात आली. युवा मोर्चाचा निवेदनाने व टोल व्यवस्थापकांचा सकारात्मक भुमिकेमुळे सर्व भाविकांचा व अन्नदात्यांचा वाहनास निशुल्क वाहतुक करण्यासाठी मदत होणार आहे व आज पर्यन्त लोकल टोल शुल्क आकरण्यात येत होते आता तेही शुल्क माफ़ करण्यात आले आहे.

यात्राकाळात टोल माफी करण्यात आली असल्याने गडावर जाणार्‍या सर्व भाविकांनी व अन्नदात्यांनी यांची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा चे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष कुणाल (भैय्या) चौधरी, संघटन सरचिटणीस सागर कोडगिर, निनाद पाटिल, सचिन जाधव,भूपेश बडगुजर, उप जिल्हाध्यक्ष नितिन पाटिल, मनोज पिसे, आकाश अग्रवाल, मयूर मोरे, बालाजी अग्रवाल, जयकिशन चौधरी, देवेन शेळके, मयूर सूर्यवंशी, अमोल बडगुजर, सचिन कायस्थ, सचिन पाटिल, विजय शेलार, कपिल महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.