यावलच्या साने गुरूजी विद्यालयाबाहेरील प्रकार ; संशयीतांचा शोध सुरू
यावल- टोळक्यांनी लाठ्या-काठ्यांनी केलेल्या हल्ल्यात चोपड्याचे दोन दहावीचे विद्यार्थी जखमी झाल्याची घटना साने गुरुजी विद्यालयाबाहेर मंगळवारी दुपारी घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मारहाणीचे नेमके कारण कळू शकले नाही तर पोलिसांकडून तोंडाला रूमाल गुंडाळलेल्या संशयीतांचा शोध सुरू करण्यात आला आहे, परवेज मुसा तेली (वय-19, रा.चोपडा) व दानिश इरफान बेग (वय-22, रा. चोपडा) अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
पेपर सुटताच चढवला हल्ला
परवजे व दानिश हे दहावीचा पेपर देण्यासाठी आले होते. पेपर सुटल्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास परीक्षा केंद्राच्या आवारातच येतात तोंडाला रूमाल बांधलेल्या
20 ते 25 जणांच्या गटाने हातात लाठ्या-काठ्या हल्ला चढवल्याने दोघांचे डोके फुटले तर पाठीवर गंभीर जखमा झाल्या. परीक्षा केंद्रावरील पोलिस व काही नागरिक तसेच शिक्षक भूषण नगरे, विनोद गायकवाड आदींनी या विद्यार्थ्यांना मारहाण करणार्यांपासून सोडवले. दोघांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवल्यानंतर डॉ.शुभम जगताप, प्रियांका मगरे आदींनी दोघांवर प्रथमोपचार केले.