टोळक्याने तरुणास मारहाण करून लुटले

0

वाकड (प्रतिनिधी) – वाकड पुलावरून पायी जात असणार्‍या तरुणाला रिक्षातून आलेल्या अज्ञात चौघांनी मारहाण करत साडेअकरा हजार रुपयांना लुटले. ही घटना वाकड येथे रविवारी (दि. 28) रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. याबाबत यशवंत माने (वय 24, रा. थेरगाव) यांनी रिक्षा (एम. एच. 14 व्ही. 6714) मधील अज्ञात चौघांविरोधात वाकड पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत माने रविवारी रात्री सुमारे साडेबाराच्या सुमारास वाकड पुलावरून जात असताना एका रिक्षामधून आलेल्या अज्ञात चौघांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीकडील दोन मोबाईल फोन, कागदपत्र व रोख रक्कम असा एकूण 11 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटला. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.