निंभोरा- सुलवाडी येथून ऐनपूर येथे बाजारासाठी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला केळी वाहतूक करणार्या ट्रकची धडक लागल्याने मागच्या चाकाखाली सापडून विवाहिता ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात अरुणा प्रकाश जोशी (30, रा.सुलवाडी, ता.रावेर) ही विवाहिता ठार झाली.
ओव्हरटेक करताना झाला अपघात
सुलवाडी येथून ऐनपूरला प्रकाश जोशी हे पत्नी अरुणासह दुचाकी (एम.एच.19 पीबी 5280) ने जात असताना केळी वाहतूक करणारा ट्रक (पी.बी.02 सी.सी.7513) ने कट मारल्याने दुचाकी मागच्या चाकाखाली आल्याने अरुणा जोशी यांचा जागीच मृत्यू झाला. प्रवीण गंभीर महाजन यांच्या शेताजवळ घडली. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करून ट्रकच्या दर्शनी भागाच्या काचा फोडल्या. या अपघात प्रकरणी रात्री उशिरा निंभोरा पोलिसात ट्रक चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.