Fatal accident near Warangaon: Two killed, including a woman from Chikhli taluka भुसावळ : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने चारचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात चिखली तालुक्यातील विवाहितेसह चालक ठार झाला. या प्रकरणी वरणगाव पोलिसात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बोहर्डी शिवारात अपघात
भरधाव ट्रक (जी.जे.13 ए.टी.8543) ने चारचाकी (एम.एच.46 ए.एल.6940) ला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रतिभा रामप्रसाद पवार (35, चिखली, ता.चिखली) व विशाल शिवाजी मोरे (27, खंडाळा मकरध्वज, ता.चिखली) यांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 7 रोजी रात्री नऊ वाजता वरणगाव-मुक्ताईनगर रस्त्यावरील पहेलवान ढाब्याजवळील बोहर्डी शिवारात झाला. या प्रकरणी रामप्रसाद नानक पवार (36, ग्रामीण रुग्णालय, धाड, जि.बुलढाणा) यांच्या फिर्यादीनुसार अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक चालक (नाव, गाव माहित नाही) याच्याविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक परशूराम दळवी करीत आहेत.