ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

0

जळगाव। भोईटे नगरातील पिंप्राळा रेल्वे गेट बंद असल्याने त्या ठिकाणी थांबलेल्या तरूणीच्या दुचाकीला मागून येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. यात तरूणी गंभीर जखमी होवून तिच्या दुचाकीचे नुकसान झाले असून तिला खाजगी रूग्णायात उपचारार्थ दाखल केले आहे. दरम्यान, ट्रक दुचाकीला धडकल्यानंतर समोरच्या रेल्वेगेटलाही धडकल्याने रेल्वेगेट देखील वाकले गेले होते. ही घटना शनिवारी सकाळी 5.45 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिवारी रात्री तरूणीच्या घेतलेल्या जबाबावरून ट्रकचालकाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धडकेत रेल्वेगेटही वाकला
भोईटेनगराकडून येणार्‍या ट्रक (क्रं.एमएच.19.4129) ने अर्चना हिच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर ट्रक समोरच्या पिंप्राळा रेल्वेगेटला जावून धडकला. यात रेल्वेगेटचा पोल वाकला गेला. त्यानंतर ही घटना धडल्यानंतर अर्चना हिच्या वडीलांनी तिला व हर्षला रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, ही घटना गेटमनला कळताच त्याने रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर ट्रकचालकाविरूध्द आरपीएफ पोलिसात शनिवारी सकाळीच गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातात मात्र दुचाकी व रेल्वेगेटचे नुकसान झाले. तर तरूणी अर्चणा हिच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या भागात किरकोळ अपघात होत असल्याने वाहतुक पोलिसाची पिंप्राळा रेल्वेगेट परिसरात नेमणुक करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल
अर्चना गणेश बडगुजर (वय-21) ही आई-वडील आजीसोबत भिकमचंद जैन नगरात राहते. तर भाऊ हा मंबईला शिक्षण घेत असून अर्चना देखील बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला आहे. यातच मंबईहून भाऊ अजय व मामी ज्योती राजेश बडगुजर व त्यांचा मुलगा हर्ष हे जळगावला येत असल्याने अर्चना ही वडील गणेश बडगुजर यांच्यासोबत मोपेड दुचाकी क्रं. एमएच.19.बी.एस.4996 ने शनिवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकावर त्यांना घेण्यासाठी गेले. त्यानंतर अर्चना हिच्या दुचाकीवरून मामी ज्योती व हर्ष हे तर दुसर्‍या दुचाकीवरून गणेश बडगुजर व अजय हे वेगवेगळ्या दुचाकीने घरी येण्यासाठी निघाले. पहाटे 5.45 वाजेच्या सुमारास रेल्वेगेट बंद असल्याने दोघानी दुचाकी थांबल्यानंतर अर्चनाच्या दुचाकीवरू ज्योती

ह्या खाली उतरून बाजूला उभ्या होत्या.
त्याच दरम्यान, मागून येणारा ट्रक (क्रं.एमएच.19.4129) ने अर्चना हिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी रेल्वेगेटवर आदळली जावून अर्चना व हर्ष हे दोन्ही फेकले जावून गंभीर जखमी झाले. यानंतर ट्रक समोरील रेल्वेगेटला जावून धडकला. यात रेल्वेगेटही वाकले गेले. तर अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गणेश बडगुजर यांनी लागलीच मुलीकडे धाव घेत तिला व हर्ष यांना रिक्षातून खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दोघांच्या हाता-पायाला दुखापत झाली आहे. अखेर शनिवारी रात्री शहर पोलिसांनी अर्चना हिचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.