रावेर- भरधाव ट्रकने समोरून येणार्या दुचाकीला कट मारल्याने दुचाकी चालकासह मागे बसलेला सहकारी जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास चोरवडनजीक घडली. रावेरकडून येणारा ट्रक (क्र.आर.जे.29 जी.ए. 4821) शहराकडे येत असताना बर्हाणपूरकडे जाणारी दुचाकी (व=फएम.पी.68 एम.ए. 3948) ला चोरवड बॅरेजनजीक कट मारल्याने दुचाकी घसरून मोहम्मद इकबाल (20) व शेख अहेमद हे जखमी झाले. ट्रक वरील अज्ञात चालकाविरूद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजय जाधव करीत आहेत.