भोपाळ– कटनीहून उमरियाकडे जाणाऱ्या एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन रिक्षांना दिलेल्या धडकेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मध्य प्रदेशच्या कटनी-उमरिया नॅशनल हायवे 78 जवळील मझगंवा गावाजवळ शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला. यानंतर ट्रक ड्रायव्हर घटनास्थळाहून फरार झाला. घटनास्थळी पोलिसांनी 4 जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये तसेच जखमींसाठी 50 हजारांच्या नुकसान भरपाईची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे.