भोसरी : भरधाव वेगात आलेल्या ट्रकने पादचारी युवकाला धडक दिली. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी भोसरी पोलीस चौकीजवळ घडली. सनी अरुण चव्हाण (वय 20, रा.भोसरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिंदेश्वर चव्हाण (वय 40, भोसरी) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादी सनी यांचे मामा बिंदेश्वर भोसरी पोलीस चौकीसमोरून भोसरी उड्डाणपुलाच्या दिशेने जात होते. त्यावेळी एक ट्रक (एम एच 14 / एफ 7559) भरधाव वेगात आला. त्या ट्रकने बिंदेश्वर यांना जोरदार धडक दिली. यामध्ये बिंदेश्वर गंभीर जखमी झाले. यानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.